चांद्रयान -२ चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बेंगळुरू :
चांद्रयान - २ मोहिमेचा आणखी एक अवघड टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पार केला आहे. चांद्रयान - २ आज सकाळी चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले आहे.
'नियोजित वेळेनुसार, आज सकाळी ९.०४ मिनिटांनी चंद्राच्या तिसऱ्या कक्षात पोहोचले,' असं ट्विट इस्रोने केलं आहे. चांद्रयानाचा आतापर्यंतचा प्रवास ठरल्यानुसार होत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणखी ११ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे इस्रोला चांद्रयानातील रोव्हर पाठवणार असला, तरी काही छायाचित्रे यापूर्वीही मिळू लागली आहेत. २३ ऑगस्टचे चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र चांद्रयानाने पाठवले आहे. टेरेन मॅपिंग कॅमेऱ्यातून हे छायाचित्र टिपण्यात आले आहे.   Print


News - World | Posted : 2019-08-28


Related Photos