देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन


वृत्तसंस्था / मुंबई :  देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे मुंबईत सोमवारी निधन झाले. उत्तराखंड पोलीस दलाने त्यांच्या निधनाबाबत समाजमाध्यमावर संदेश पाठवून दु:ख व्यक्त केले आहे. 
मुंबई येथील रूग्णालयात चौधरी  यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली आहेत. चौधरी या १९७३ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी  होत्या. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. २००४ ते २००७ या काळात त्या उत्तराखंड पोलिस दलात महासंचालक पदावर होत्या.  ३३ वर्षांच्या सेवेत त्यांनी बॅडमिंटनपटू सईद मोदी  मृत्यू प्रकरण, रिलायन्स -बॉम्बे डाइंग प्रकरण यात तपास केला होता. त्याआधी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातही काम केले. १९९७ मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक मिळाले. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राजीव गांधी पुरस्कारही मिळाला होता. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज  बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.   Print


News - World | Posted : 2019-08-28


Related Photos