आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या आश्वासनानंतर एटापल्लीतील उपोषण मागे


- समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / एटापल्ली :
तालुक्यातील समस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे असल्याने एटापल्ली तालुक्यातील नागरीक, व्यापारी, संघर्ष समितीच्या वतीने विविध टप्प्यांचे १६  ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले होते. यामुळे एटापल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी आज २७  ऑगस्ट  रोजी उपोषणकर्त्यांशी  चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच उपोषणकर्त्यांना  लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.
एटापल्ली - आलापल्ली मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, मार्गाचे रूंदीकरण झाल्याशिवाय लोहखनीचे वाहतूक करू नये, कोनसरी येथील लोहप्रकल्पात एटापल्ली तालुक्यातील बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, तालुक्यातील नागरीकांना शौचालय व घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध करून द्यावी, जिल्हा परिषद कनिष्ठ माहाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्यात यावी, पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी सोलर पंपद्वारे नळपाणीपुरवठा योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरीक उपोषणाला बसले होते. व्यापाऱ्यांनी  बाजारपेठ बंद ठेवली होती. शाळा, महाविद्यालये बंद होती. या संपूर्ण आंदोलनाची दखल घेत राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी एटापल्लीत आंदोलनकर्त्यांशी  चर्चा करून सर्व मागण्या कोणत्याही परिस्थितीत सोडविणारच असे आश्वासन दिले. कोणत्याही संघटना किंवा राजकीय पक्षांच्या भुलथापांना बळी पडू नका, मागण्यांबाबत आजपासूनच पाठपुरावा करू, असे आश्वासन राजे आत्राम यांनी दिले. यामुळे आंदोलनकत्र्यांचे समधान झाले असून आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-27


Related Photos