महत्वाच्या बातम्या

 अमरावती विद्यापीठाच्या समन्वयकांची आकाशवाणी केंद्रावर १७ व १८ नोव्हेंबरला मुलाखत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक रमेश जाधव यांची मुलाखत अमरावती आकाशवाणी केंद्राच्या विविधा कार्यक्रमाच्या नमस्कार या सदरात १७  व १८  नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०. ३० वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे.
विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागांतर्गत नाट्य व रंगभूमी आणि नृत्यशास्त्र हे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत. वर्षभरात या विभागाने राज्यस्तरीय चर्चासत्र, नाट्य व रंगभूमीमध्ये जत्रा व फकिरा एकांकीका सादर करुन द्वितीय व तृतीय पारितोषिके तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या युवा महोत्सवामध्ये विभागाच्या दोन विद्यार्थानी स्किटमध्ये कलरकोट मिळवून विद्यापीठाचा सन्मान वाढविला. या सर्व बाबींची दखल घेऊन अमरावती आकाशवाणी केंद्राने रमेश जाधव यांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले होते, त्या मुलाखतीचे प्रसारण सकाळी १०.३० वाजता आकाशवाणीच्या अमरावती केंद्र एफएम बíड १०१.५ मेघा हर्टज्वर केले जाणार आहे. प्रादर्शिक कला विभागाच्या वाटचालींबाबत सादर होणा-या माहितीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos