कोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्यावर दारू विक्रेत्यांचा जीवघेणा हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  बल्लारपूर :
तालुक्यातील कोठारी पोलीस ठाण्याचे  ठाणेदार संतोष अंबिके आपल्या  चमू सोबत कवड्जाई गावात अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी  गेले असता अवैद्य दारूविक्रेत्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदर घटना काल २६ ऑगस्ट रोजी घडली आहे. 
अवैद्य दारूविक्री  होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या उद्देशाने तपास करीत असताना येथील दारू विक्रेता विशाल पोरेते व इतर ३ ते ४  विक्रेत्यांनी पोलीस पथकावर   कुऱ्हाडीने जीवघेणा  हल्ला केला.  त्यात कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांना डोक्यावर जबर मार लागल्याने जखमी झाले.  त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे एका  खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले.   कोठारी पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील  ही दुसरी घटना आहे. याआधी   एका महिला पोलीस शिपायावर  हल्ला करण्यात आला होता. आरोपींवर  कलम ३०७, ३५७, ३३२ (३४)  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-27


Related Photos