महत्वाच्या बातम्या

 १७ ते २० जानेवारी पर्यत संस्थेमार्फत जिल्ह्यातील मत्स्यकास्तकारांना प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील मत्स्यकास्तकारांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एमपेडा या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या मास्टर ट्रेनर मार्फत भंडारा, तुमसर, साकोली व पवनी या ठिकाणी अनुक्रमे १७, १८, १९ व २० जानेवारी २०२४ रोजी प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

एमपेडा अर्थात समुद्री उत्पादक निर्यात विकास प्राधिकरण हि संस्था भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालय तर्फे मत्स्यव्यवसाय विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करते. जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी नागपुर विभागीय आयुक्तमा. विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली २२ ऑगस्ट २०२३ रोजी सहसंचालक (प्रशिक्षण) एमपेडाकोचिन, उपसंचालक एमपेडामुंबई व टीम यांचे समवेत सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेमध्ये  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. या  सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार २३ ऑगस्ट २०२३ रोजी एमपेडाटीमने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, गोसे जलाशय, शिवणीबांध इत्यादी ठिकाणी भेट देऊन मत्स्यव्यवसायिकां बरोबर चर्चा केली. त्यानंतर एमपेडासंस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मत्स्यव्यसायाबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले होते.

त्या अनुषंगाने सदर प्रशिक्षणाचे पहिले सत्र जिल्हा नियोजन सभागृह भंडारा येथे १७ जानेवारी २०२४ रोजी पार पडले. एमपेडासंस्थेचेक्षेत्र पर्यवेक्षक अतुल साठे यांनी गिफतिलापीया, पंग्याशिअस संवर्धन, गोड्या पाण्यातील झिंगा संवर्धन व खाद्य व्यवस्थापन, तसेच प्रति जैविके न वापरण्या विषयी जनजागृती इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, उमाकांत सबनीस,मुख्यमंत्री फेलो निलेश साळुंके, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी महेश हजारे व जिल्हातील मत्स्यकास्तकार, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे सभासदव  मत्स्यसखी उपस्थित होत्या.





  Print






News - Bhandara




Related Photos