खड्ड्यांमुळे कोरची - भीमपुर मार्गाची दुरवस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
कोरची - भीमपुर  या मार्गावर ठिकठिकाणी मोठ - मोठे जीवघेणे खड्डे पडले असल्याने या मार्गाने आवागमन करतांना नागरिकांना त्रास होत आहे. या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे  मार्गाची दुरूस्ती करावी , अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
 कोरची - भीमपुर या ४  किमी मार्गावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या मार्गाची अनेकदा डागडुजी करण्यात आली. परंतु डागडुजी नंतर अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था होऊन ' जैसे थे ' स्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत.
 कोरची येथून छत्तीसगडला जाण्यासाठी छोटी वाहने तसेच जड वाहनांची दिवस-रात्र याच मार्गाने वाहतूक असते.विशेष म्हणजे या रस्त्यावरून शाळेत येणारे विद्यार्थी मोठ्या प्रमानात येणा - जाणा करीत असतात.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-25


Related Photos