महागाव येथे नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला तातडीने पोहचले आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम


- अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घरांची केली पाहणी, प्रशासनाला तात्काळ पंचनामा करण्याचे  दिले  आदेश 
- नुकसानग्रस्त कुटूंबाना स्वतःकडून केली आर्थिक मदत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी उपविभागात गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाला आहे.  अतिवृष्टीमुळे अहेरी जवळील महागाव (बु) येथील महादेव गंगा वेलादी व शिवकुमार राजेश जनगम यांचे राहते घर काल शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास पूर्णपणे कोसळले . यामुळे त्यांचे  मोठे नुकसान झाले होते.  या घटनेची माहिती लगेच भाजपा अहेरी तालुका उपाध्यक्ष संजय अलोने यांनी अहेरीचे आमदार  राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना दिली होती.  याची तातडीने दखल घेत कालच  आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी तहसीलदार  प्रशांत घोरुडे यांना सोबत घेऊन महागाव गाठले.  नुकसानग्रस्त घरांची पूर्ण पाहणी केली . सोबतच महादेव वेलादी व शिवकुमार जनगम यांच्याशी आस्थेने संवाद साधला. 
तहसीलदार घोरुडे  यांना   नुकसानग्रस्त घरांचा तात्काळ पंचनामा करून शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. ,तसेच मुख्यमंत्री घरकुल योजनेतून   नुकसानग्रस्तांना घर मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू असेही यावेळी आमदार आत्राम यांनी    सांगितले. 
  घर पडल्याने हे कुटुंब रस्त्यावर आले आहेत.  अशा  बिकट परिस्थितीत त्यांना तातडीची मदत आवश्यक असल्याचे लक्षात आल्यावर आमदार आत्राम यांनी  स्वतःकडून दोन्ही कुटूंबाना आर्थिक मदत केली.  यावेळी अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे, जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका उपाध्यक्ष संजय अलोने, ताराचंद गोंगले, दामाजी गोंगले, विलास अलोने, अंकित गोंगले,शिवकुमार टेकुल, शंकर टेकुल यांच्यासह महागाव येथील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-24


Related Photos