महत्वाच्या बातम्या

 डाक विभागामार्फत पेंशन अदालतीचे आयोजन          


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा : पेंशन संबंधीच्या ज्या तक्रारीचे निवारण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची पुर्तता करण्यासाठी अधीक्षक डाकघर, वर्धा येथे 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पेंशन अदालीचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधितांनी पेंशन बाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, वर्धा यांचे नावे 23 जानेवारी अथवा तत्पुर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीचा विचार करण्यात येणार नाही. तसेच पेंशन अदालतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे डाकघर अधीक्षक पी.ए.गेडाम यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos