महत्वाच्या बातम्या

 खांबाडा विद्यालयाची शैक्षणिक सहल नागपूर परिसरात रवाना 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / खाबांडा : सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्था सुमठाणा, (पुनर्वसन) द्वारा पुरस्कृत छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय खांबाडा येथील शाळेची एक दिवसीय शैक्षणिक सहल नागपूर परिसरात शैक्षणिक व ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठीआज १६ जानेवारी २०२४ ला नागपुर नजीक असणार्या द्वारका येथे रवाना झाली.

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व शैक्षणिक ठिकाणांची माहिती व्हावी, परिसरातील विविध घडामोडींबद्दल माहिती व्हावी, या उद्देशाने विद्यालयाची शैक्षणिक सहल नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र, महाराज बाग, झिरो माइल, दीक्षाभूमी, मॉल व मेट्रो प्रवास तथा द्वारका येथील वाँटरपार्क व कोराडी येथील मंदिर इत्यादी ठिकाणांना भेट देऊन सुरक्षित खाबांडा येथे त्याच दिवसी रात्री परत येणार असल्याचे विद्यालयाचे मुख्यध्यापकांनी सांगीतले.

यावेळी या सहलीत, विद्यार्थ्याना शिस्तबद्ध मार्गदर्शन सहायक शिक्षक नंदकीशोर खिरटकर करणार असल्याचे सांगीतले. या शैक्षणिक सहलिला विद्यालयाचे एकुण १०३ विद्यार्थी सहभागी झाले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos