महत्वाच्या बातम्या

 कृषी आणि तृणधान्य प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : आमदार विनोद अग्रवाल


- कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या लाभाचे कार्यक्रम आयोजन काळाची गरज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी आणि तृणधान्य प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले असून आमदार विनोद यांनी प्रदर्शनी ला भेट दिली. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख आणि वसंतराव नाईक यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी मानले. सोबतच आपला देश हा कृषी प्रधान देश असल्याने असे कार्यक्रम आयोजन करने ही काळाची गरज असल्याचे मत देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. शेतीच्या विकासासाठी आणि आधुनिकीकरणासाठी तसेच शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळावी. यासाठी गल्ली ते दिल्ली पर्यंतचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी बांधवांसाठी विविध चर्चासत्र, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे.

सुरुवातीपासून शेती आणि शेती पूरक व्यवसाय भारतात केला जात आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी होळ लागली आणि रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला यामुळे शरीरावर याचा विपरीत परिणाम दिसत आहे. पौष्टिक आणि जैविक शेतीची गरज समजून शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्यासाठी विचार केला पाहिजे. उत्पादन आणि उत्पन्न ह्या शेतीच्या दोन बाजू असून शेतकरी आणि शासन समन्वय साधने काळाची गरज असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी बोलून दाखवले. उत्पादन- प्रक्रिया- ग्राहक हे चक्र समजून त्यानुरूप धोरण तयार करणे शासनाची भूमिका असते. त्यामुळे उत्पादन करणाऱ्यांनी आता प्रक्रिया करणे शिकले पाहिजे, असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकरी बांधवांना केले.

सोबतच शासनाने देखील या बाबत जनजागृती करावी अशा सूचना देखील केल्या. टमाटे स्वस्त केचप महाग, आलू स्वस्त चिप्स महाग, गहू स्वस्त ब्रेड महाग, तांदूळ स्वस्त इडली महाग त्यामुळे प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात निर्माण होणे गरजेचे आहे. कोल्ड स्टोरेज आणि साठवण गोदाम मोठ्या प्रमाणात निर्माण करणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक गावात कृषी गोदाम बांधण्याचे स्वप्न माझे असून ते पूर्णत्वास नेणार असल्याचा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला. जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे, सिंचनाची मुबलक सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकरी शेती आधारित उद्योग सुरू करू शकतो.

आपल्याला धावत्या पाण्याला चालवणे, चालत्या पाण्याला थांबविणे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरावण्याचे तत्वज्ञान राबवावे लागेल. प्रक्रिया केंद्र, साठवण केंद्र, जल संधारण यांची व्यवस्था करून स्थानिक शेतकऱ्यांचे शेतमाल करिता बाजार उपलब्ध करून देण्यासाठी महिला उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अशा तऱ्हेने प्रत्येक गावात ५ महिलांना जरी रोजगार मिळाला तर पूर्ण जिल्ह्यात २० हजाराच्या जवळपास महिलांना रोजगार मिळू शकतो. असा आशावाद आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला.

दरम्यान जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, आमदार मनोहर चांद्रिकापुरे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती पूजा शेठ, आत्मा प्रकल्प संचालक अजित अडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चौहान, मुनेष रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, विभागीय कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे, जिल्हा समन्वयक अधिकारी संजय संगेकर, माविम , आत्मा चे अधिकारी आणि कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos