निपा दिल्ली तर्फे आयोजीत राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक नेतृत्व परिषदेसाठी वाळवी शाळेची निवड
- गौरवान्वित गोटुल ला आमंत्रण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था दिल्ली निपा तर्फे आयोजित शालेय नेतृत्व विकास विषयावरिल शैक्षणिक राष्ट्रीय परिषदेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळवी ची महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड झाली.
निपा आयोजित राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक नेतृत्व परिषदेमध्ये यशोगाथा सादरीकरणाकरिता गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा केंद्रांतर्गत वाळवी या शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्रीकांत काटेलवार यांची निवड झाली आहे. 29 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान होणाऱ्या या परिषदेत काटेलवार यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
या परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शाळांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शाळा प्रमुखांची भूमिका ओळखून आणि त्यांना प्रोत्साहन देऊन शालेय नेतृत्व साजरा करणे हे आहे. शाळेतील गुणवत्ता सुधारणेवर शालेय नेतृत्वाचा प्रभाव ओळखणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारण्यासाठी नेतृत्व पद्धती आणि नवकल्पना सामायिक करणे आणि त्यावर चर्चा करणे आणि पुढे विद्यार्थ्यांचा कल सुधारण्यासाठी विविध शालेय संदर्भांमध्ये नेतृत्व पद्धतींचे पुरावे प्रसारित करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. शालेय नेतृत्वाच्या क्षेत्रातील नवीन उपक्रम, नवकल्पना, दृष्टीकोन आणि अनुभव सामायिक करण्यासाठी अग्रगण्य शिक्षणतज्ञ, अभ्यासक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न परिषद करते. अतिशय दुर्गम, डोंगराळ भागातील शाळेची निवड होणे ही बाब समस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. देशभरातून 400+ केस स्टडीज आणि 30+ शोधनिबंधा चे परिषदेत सादरीकरणासाठी आलेल्या प्रस्तावातून तज्ज्ञ समितीने परिषदेत सादरीकरणासाठी यांपैकी सर्वोत्कृष्ट गोष्टींची तपासणी केली आहे. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळवी शाळेतील यशोगाथा ची निवड महाराष्ट्र राज्यातून केली.
मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी शाळेत राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रम, शाळा विकासात सामाजा चा सहभाग, शाळेचा विकासात झालेला अमुलाग्र बदल या सर्व गोष्टी चे सादरीकरण होणार आहेत. राष्ट्रिय स्तरावरील वाळवी शाळेच्या यशाबद्दल गट्टा केंद्राचे केंद्रप्रमख मंतय्या बेडके, एटापल्ली चे गट शिक्षणाधिकारी निखिल कुमरे,प्राथमिक शिक्षणाधिकारी नाकाडे , डायट सर्व टीम नी खूप खुप अभिनंदन केले. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
News - Gadchiroli