महत्वाच्या बातम्या

 विकसीत भारत संकल्प यात्रेला वर्धा शहरात मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा : भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून  विकसीत भारत संकल्प यात्रा हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

शहरी आणि ग्रामीण भागात 17 महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ज्यांना आतापर्यंत कोणत्याच योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न आहे. 

सदर योजनेत काय काय लाभ मिळू शकतात, कोण लाभार्थी होऊ शकतात, यासदंर्भात एकत्रित माहिती देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी विकसित भारत संकल्प रथाला भेट देण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

नगर परिषद वर्धा कार्यालय मध्ये आज 15 जनेवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता विकसीत भारत संकल्प यात्रेला हिरवी झेंडी देऊन नागरी भागासाठी संकल्प यात्रेचे मान्यवरच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले (भा.प्र.से), जिल्हा सह आयुक्त हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी तथा प्रशासक न.प. वर्धा राजेश भगत तथा नगर परिषद सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच नगर परिषद क्षेत्रातील अठरा योजनाचे लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर विकसीत भारत संकल्प यात्रा रथ शहरात विविध ठिकाणी भेट देऊन केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती देणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos