महत्वाच्या बातम्या

 सशक्तलोकशाही करिता युवाशक्तीची गरज : प्राचार्य डाॅ. लाभसेटवार 


- चिंतलपेठ येथे श्रमसंस्कार शिबीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / अहेरी : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित शंकरराव बेझलवार महाविद्यालय अहेरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थीचे राष्ट्रीय सेवायोजना विषेश श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन चिंतलपेठ येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात आयोजित करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी शिबीराचे औपचारिक उद्घाटन जेष्ट पत्रकार प्रकाश दुर्गे यांनी रासेयोचा ध्वज फडकवून केले. यावेळी विचारमंचावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश लाभसेटवार हे होते तर प्रमुख उपस्थिती गाव पाटील निरंजन दुर्गे, एसएमसी अध्यक्ष भिमराव दुर्गे, एनएनएस कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.एन. गौरकर, प्रा.पी.व्ही. घोडेस्वार यांची उपस्थिती होती.

देश आज विकासाचे मार्गावर आहे. देश विकासात युवकांचे मोठे योगदान आहे. सुदृढ लोकशाही हा आपल्या संविधानाचा मुळ आत्मा आहे. म्हणून सशक्त लोकशाही करीता युवाशक्तीची आज देशाला गरज आहे. म्हणून युवकांनी संघटीत होऊन आपली लोकशाही मजबूत करायला पुढे यावे, असा आवाहन प्राचार्य डाॅ. प्रकाश लाभसेटवार यांनी केले.

महाविद्यालयीन विद्यार्थीना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात गटा-गटातून विविध कामाचे वाटप केले जाते. यातुन श्रम व श्रम संस्काराचे महत्त्व विद्यार्थीना समजते. चिंतलपेठ गावाचे सुक्ष्म सर्वेक्षण करून विद्यार्थीनी गावातील मुलभूत समस्या जानूण घेऊन त्यातील काही समस्या विद्यार्थीनी श्रमदानातून पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धेच्या युगात ठीकुन राहण्यासाठी आपण चांगले शिक्षण घेऊन व मेहनत करून आपले लक्ष निश्चित करा. विद्यार्थीनी या वयात इतर कोणत्याही वाम मार्गाला न लागता केवळ आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ट पत्रकार प्रकाश दुर्गे यांनी केले.

याप्रसंगी गावचे पोलीस पाटील निरंजन दुर्गे यांनीही विद्यार्थीना मार्गदर्शन करीत शिबीराचे महत्त्व समजावून सांगीतले.

या सात दिवसीय शिबीरात विविध विषयांवर तज्ञाने मार्गदर्शन लाभणार आहेत. त्यात सिकलसेल व कॅन्सर जनजागृती, मतदान जनजागृती व रॅली, आधुनिक शेतीतून रोजगार निर्मिती, पोस्टाच्या विविध कल्याणकारी योजना, ग्राम सर्वेक्षण व विद्यापीठ आपल्या दारी यामुख्य विषयासह इतरही उपविषयावर मार्गदर्शन व चर्चा केली जाणार आहे. तसेच सायंकाळी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबीराचा शेवट विस जानेवारीला केला जानार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.एन. गौरकार यांनी केले. संचालन प्रा.डाॅ. रुपाली घोनमोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.व्ही. घोडेस्वार यांनी मानले. या शिबिरात पदविका प्राप्त करणारे पहिल्या वर्षा पासुनचे तर अंतीम वर्षांपर्यंतचे एकुण पन्नास चे वर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाला प्रा. अमोल शंभरकर, प्रा. गौरव तेलंग, प्रा. नामदेव पेंदाम, प्रा. संभावित लांडे, ज्ञानदीप आवारी, प्रा.डाॅ. सोनाली वाघ, प्रा. प्रतिभा जवादे यांचे सहकार्य मिळाले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos