महत्वाच्या बातम्या

 महासंस्कृती महोत्सवासाठी रामटेक शहराची तयारी सुरू


- जागतिक ख्यातीच्या कलाकारांसोबत स्थानिक कलांचेही सादरीकरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासाच्या भूमीतून रामटेक येथून १९ ते २३ जानेवारीला होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज या संदर्भातील आढावा घेतला. रामटेकचे नेहरू मैदान या आयोजनासाठी सज्ज होत असून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज आयोजनाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा, सांस्कृतिक व पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या नेहरू मैदानात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन १९ ते २३ जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे.

स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात हेमा मालिनी, कैलास खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

१९ ते २३ जानेवारीदरम्यान आयोजित या महोत्सवादरम्यान १९ जानेवारी रोजी अभिनेत्री हेमा मालिनी, २० जानेवारी रोजी हंसराज रघुवंशी यांचा कार्यक्रम, २१ जानेवारी रोजी लोकनृत्य २२ जानेवारी रोजी महानाट्य रामटेक, २३ जानेवारी रोजी कैलास खेर यांचा कार्यक्रम होणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos