महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पीएम विश्वकर्मा योजनेचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पीएम विश्वकर्मा योजनेचा जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेतला.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जिल्हा अंमलबजावणी समितीची सभा आज जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. यात जिल्ह्यातील या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. यासाठी कार्यान्वयन यंत्रणेने गतीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. 





  Print






News - Nagpur




Related Photos