महत्वाच्या बातम्या

 २३ जानेवारी पासून चामोर्शी शहरात रात्रकालिन नमो चषक प्रो, कबड्डी स्पर्धेचे आयोजन


- डिजेच्या तालावर, हायमास्टच्या लक्ख प्रकाशात होणार

- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेकडो कबड्डी पटुंचा घे पंगा, कर दंगा

- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रातील विजयी कबड्डी चमू व स्थानिक चमूचा सहभाग

- खासदार अशोक नेते यांचा पुढाकार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने चामोर्शी येथील स्थानिक संताजी क्रीडांगण येथे जय बजरंग युवा मंडळ (गोंडपुरा) चामोर्शी जिल्हा गडचिरोली द्वारा, आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी शहरात २३ जानेवारी पासून प्रथमच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठे भव्य खासदार नमो चषक प्रो, कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धेकरिता प्रवेश फी तीन हजार रुपये व आक्षेप फी सहा हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेचे प्रथम बक्षीस एक लाख ११ हजार १११ रुपये व द्वितीय बक्षीस ९९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आले आहे. या आयोजित स्पर्धेत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली विधानसभा अहेरी विधानसभा बल्लारपूर विधानसभा ब्रह्मपुरी विधानसभा व आरमोरी विधानसभा चिमूर विधानसभा व आमगाव विधानसभा क्षेत्रातील कबड्डी स्पर्धेत विजय झालेले सर्व विजयी चमु सहभाग घेणार आहेत तसेच सदर स्पर्धा खुली असल्याने या स्पर्धेत प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील व विदर्भातील विविध जिल्ह्यातून पट्टीचे कबड्डीपटू सहभाग घेणार आहे. 

सदर कबड्डी स्पर्धा रात्र कालीन असल्याने मैदानावर हायमास्ट लावण्याचे काम सुरू आहे तसेच सदर संपूर्ण स्पर्धा एलईडी स्क्रीनवर व व्हाट्सअप फेसबुक ट्विटर आणि टीव्ही चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे चामुर्शी शहरात या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेच्या निमित्याने भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जय बजरंग युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आशिष पिपरे यांनी सांगितले या स्पर्धेच्या निमित्ताने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ५ हजार नव युवकांची नोंदणी करण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेत लाखो रुपयाच्या प्रोत्साहन पर बक्षिसांची लय लूट केली जाणार आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील तमाम कबड्डीपटू यांनी सहर्ष सहभाग घ्यावा व ठेवण्यात आलेली बक्षिसे विजय मिळवून मान्यवरांच्या हस्ते प्राप्त करावे असे आवाहन केले.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धेचे संयोजक खासदार अशोक नेते यांचे चामोर्शी जनसंपर्क कार्यालय प्रमुख रमेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगितले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos