आल्लापल्ली येथे आविसं नेत्यांची महत्वपूर्ण बैठक , आगामी विधानसभा निवडणूक व कार्यकर्ता बैठकीबाबत चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
आल्लापल्ली येथे काल २२ ऑगस्ट रोजी  आदिवासी विद्यार्थी संघाच्या  नेत्यांची महत्वपूर्ण बैठक माजी आमदार व आविस नेते दिपक  आत्राम यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. 
  या बैठकीला माजी आमदार दिपक  आत्राम ,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय  कंकडालवार, जिल्हा परिषद सदस्या अनिता दिपक आत्राम सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.
 या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक व प्रत्येक तालुका ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यात अहेरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा  मेळावा   आल्लापल्ली येथे आयोजित करण्याचे ठरविले. अहेरी नंतर सिरोंचा येथे कार्यकर्ता मेळावा घेण्याचे निश्चित केले असून मूलचेरा, भामरागड व एटापल्ली येथे ही लवकरच करकर्त्यांचा  मेळावा घेण्याचे बैठकीत ठरविले.
 या बैठकीला आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव , जिल्हा परिषद सदस्य अजयभाऊ नैताम, सिरोंचाचे आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम, आविस सल्लागार रवी सल्लम,आल्लापल्ली ग्राम पंचायतचे माजी सरपंच विजय कुसनाके सह आविसचे मान्यवर  उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-23


Related Photos