महत्वाच्या बातम्या

 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दीड कोटी रुपयांच्या विकासकामाचे भुमीपूजन


- ब्रम्हपूरी शहरातील सुंदरनगर, गांधीनगर, हनुमाननगर येथील विकासकामांचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपूरी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सुंदरनगर, गांधीनगर, हनुमाननगर येथील विकासकामांना प्रारंभ झाला असुन या प्रभागात दिड कोटी रुपयांच्या विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ह्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले आहे.

यामध्ये गांधीनगर, सुंदरनगर, हनुमान नगर येथील रस्ते डांबरीकरण करणे, सिमेंट काॅक्रेटचे रस्ते व नाल्यांचे बांधकाम करणे या सुमारे दीड कोटी रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे.

नगर परिषद ब्रम्हपुरी अंतर्गत येत असलेल्या सुंदरनगर, गांधीनगर, हनुमाननगर या प्रभाग क्रमांक ७ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या उभी ठाकली होती. तर या प्रभागामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न देखील नाल्या अभावी प्रलंबित होता. या दोन्ही प्रश्नांना घेऊन येथील नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर मागणी रेटून धरल्याने अखेर नगर परिषद ब्रम्हपुरीच्या विशेष रस्ता अनुदान योजना सन २०२१- २२ अंतर्गत शासन स्तरावरून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वतः विशेष प्रयत्न करून रस्ता व नाली विकास कामासाठी निधी मंजूर करून देत अखेर गांधीनगर व सुंदरनगर, हनुमाननगर या प्रभागांच्या समस्यांना पूर्णविराम देत विकासकामे उपलब्ध करून दिली आहेत.

सदर भुमीपुजन कार्यक्रमप्रसंगी न.प. नगराध्यक्षा सौ. रिता उराडे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेविका रुपाली रावेकर, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, रवी पवार, अमित कन्नाके,सुधाकर पोपटे, राहुल सातपुते यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos