लाच स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे पैसे मंजूर करून दिल्याचे सांगून ४ हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोप केशव हिरालाल निपाणे,   (५३) असे लाचखोर  ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून तो ग्रामपंचायत सेंदुरवाफा ता. साकोली जि. भंडारा येथील सदस्य आहे. तक्रारदाराला   स्वच्छ  ग्राम अभियान अंतर्गत  स्वतःच्या पैशांनी बांधलेल्या शौचालयाचे पैसे स्वच्छता ग्रामअभियान योजने अंतर्गत मंजूर करून दिल्याचे सांगून ग्रामपंचायत सदस्य केशव निपाने याने  मोबदला म्हणून ५ हजार रूपये  लाचेची मागणी केली व तडजोडीअंती ४ हजार ५०० रूपयांची लाच  स्विकारल्याने  २५ जानेवारी २०१६ रोजी पो.स्ट साकोली जि. भंडारा येथे कलम ९ ला.प्र.का १९८८ अन्वये गुन्हा  नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण करून  न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांच्या विशेष न्यायालयात सदर खटला चालविण्यात आला.   काल २२ ऑगस्ट रोजी  न्यायालयाने आरोपी केशव हिरालाल निपाणे याला कलम ९ लाप्रका मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड , दंड न भरल्यास ३ महिने आणखी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास  तत्कालीन पोलीस निरीक्षक  प्रदिप पुल्लरवार यांनी नापोशि भाऊराव वाडीभस्मे यांच्या मदतीने पुर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. विनोद भोले यांनी काम पाहिले व त्यांना   पोलीस उपअधीक्षक महेशचाटे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी,   पोहवा रविन्द्र गभने व पोलिस शिपाई संदीप पडोळे  यांनी सहाय्य केले.  

   Print


News - Bhandara | Posted : 2019-08-23


Related Photos