महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्रालय भारत सरकार च्या वतीने नेहरू युवा केंद्र, भंडारा द्वारा १० जानेवारी २०२४ रोजी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा प्रगती महिला कला महाविद्यालय येथे घेण्यात आली.

या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा कार्यक्रम चे उद्घाटन संचालक, प्रशांत देशकर प्रगती महिला समाज यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. श्यामकुमार चरडे, प्रगती महिला कला महाविद्यालय, तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. ज्योती नाकतोडे, डॉ. क्रिष्णा पासवान, दिपाली ठाकरे, तथा नेहरु युवा केंद्राचे रमेश अहिरकर व कार्यक्रम सहाय्यक उपस्थित होते.

कार्यक्रमचे उद्घाटन प्रसंगी संचालक, प्रशांत देशकर यांनी आपल्या भाषणात आपला भारत विकसित भारत २०४७ कसा असावा. या विषयी स्पर्धाकांना मार्गदर्शन केले.

तसेच जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेते जिल्हयातून लाखांदूर तालुक्यातील महेश यादवराव मेश्राम, यांनी निवड करण्यात आली. तर कार्यक्रम चे संचालन डॉ. शालिका राठोड यांनी केले. तर अभार प्रर्दशन सुर्यकांत मरघडे यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos