महत्वाच्या बातम्या

 मानवी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ आवश्यक : आमदार कृष्णा गजबे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधि / आरमोरी : ज्याप्रमाणे बुद्धीच्या विकासासाठी अभ्यासाची आवश्यकता असते त्याप्रमाणे शरीराच्या विकासासाठी व शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिवनात खेळाचे खुप महत्व आहे. ज्या व्यक्तीला अभ्यासाची व खेळाची आवड असते तो जिवनात नक्कीच यशस्वी झाल्या शिवाय राहत नाही. 

ठाणेगाव नवीन येथे १४ जानेवारीला ठाणेगाव प्रिमीयर लिग क्रिकेट मंडळाच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून आमदार कृष्णा गजबे यांनी प्रतिपादन केले. 

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे, डॉ. चंद्रप्रकाश डोंगरवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या क्रिकेट स्पर्धे मध्ये पहिल्या तीन विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक ५० हजार १, द्वितीय ३० हजार १ तर तृतीय २० हजार १ रुपये असे अनुक्रमे तीन पारितोषिक ठेवण्यात आले आहेत.‌ तसेच उत्कृष्ठ खेळाडूसाठी चषक व काही व्यक्तिगत बक्षीससुद्धा ठेवण्यात आली आहे. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वासुदेव मंडलवार सरपंच ठाणेगाव, भाजपा जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद कुथे, तमुस अध्यक्ष घनश्याम कुनघाडकर ठाणेगाव, आरोग्य सेवक शशीकांत मडावी, माजी उपसरपंच लालाजी कुकडकर, नंदु नाकतोडे, पोलिस पाटील उत्तम पेंदाम ठाणेगाव,‌ रविंद्र नैताम, गोपाल भांडेकर, दिनेश जुआरे, गिरीधर कुनघाडकर, हिरामण चापले, मंगल मडावी इ. उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर किरमे यांनी केले, प्रास्ताविक लालाजी कुकडकर तर आभारप्रदर्शन मिथुन धोडरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाच्या युवकांनी ‌मेहणत घेतली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos