महत्वाच्या बातम्या

 युवकांनी मैदानी खेळाचे आयोजन करून खेळ खेळावे : खासदार अशोक नेते


- खासदार चषक स्पर्धा 

- नव तरूण बजरंग कबड्डी स्पर्धा मौजा-वांद्रा तालुका ब्रह्मपुरी आयोजित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर (ब्रम्हपुरी) : मकरसंक्रांती च्या शुभपर्वावर खासदार चषक भव्य खुले प्रो कब्बडी स्पर्धा नवतरुण बजरंग कबड्डी ग्रुप वांद्रा तालुका- ब्रम्हपुरी यांच्या सौजन्याने सतत ४ दिवस कबड्डी स्पर्धेचे सामने चालू होते. आज शेवटचा अंतिम सामना आयोजित करण्यात आले.

या खासदार चषक कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वच्छतेचे महान पुजारी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून राष्ट्रगीताने कबड्डी चा अंतिम  सामनन्याची सुरुवात करण्यात आली. प्रथम बाजी सुभाष क्रीडा ग्रुप मांढळ या संघांने जिंकत बाजी मारली आणि दुसरा पारितोषिक चिखली या संघांने विजय प्राप्त केला.

या खासदार चषक कबड्डी समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना युवकांनी मैदानी खेळाचे आयोजन करून खेळ खेळावे. आजकाल मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होतांना दिसते. मैदानी खेळ हा लोप पावत असून आजच्या काळात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष न करता अशा मैदानी खेळाचे आयोजन इतरही मंडळाने करावे. मैदानी खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते. कबड्डी हा मैदानी खेळ म्हणून युवा वर्गानी मोठया उत्साहाने आनंदाने खेळतात, असे प्रतिपादन खासदार चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन स्थानावरून खासदार यांनी केले.

यावेळी माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी खेळाडूंचा उत्साह द्विगुणी वाढविण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने  उत्साह निर्माण केला.

 या प्रसंगी खासदार अशोक नेते व प्रा. अतुल देशकर यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवून हस्तांदोलन केले कबड्डीच्या सामन्याच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी समारोपीय व बक्षीस वितरण सोहळ्याचे उद्घाटन खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, अध्यक्षस्थानी प्रा. अतु देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र, अरून शेंडे भाजपा तालुका अध्यक्ष ब्रम्हपुरी, प्रा. रामलाल दोनाडकर भा.ज.यु.मो. तालुका अध्यक्ष, शंकर सातपुते जेष्ठ नेते भाजपा, वंदना शेंडे महिला मोर्चा संयोजिका, इंजी. अविनाश मु. मस्के तालुका महामंत्री भा.ज.यू.मो. ब्रम्हपुरी तालुका, महादेव मडावी सरपंच वांद्रा, एकनाथ मेश्राम, गुरुदेव वाघरे उपसरपंच वांद्रा, बाळकृष्ण साखरे, लोमेश मेश्राम, पिंटू अंबोरकर, धीरज पाल सयोंजक भाजपा. सो.मी. ब्रम्हपुरी तालुका, नरड वांद्रा, कोडपे बेलगाव, रामकृष्ण मेश्राम, प्रफुल सातपुते, शेखर मेश्राम, दिलीप आंबोरकर, डेनी अंबोरकर, निरांजन ठाकरे, दयाराम मेश्राम, रामदास कोरटे, रोहित अंबोराकर, अतुल मेश्राम, वक्रतुंड मेश्राम, नरेश पाल, राकेश नरुले, तसेच मोठ्या संख्येने गावातील युवक वर्ग व बंधू भगिनींनी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos