महत्वाच्या बातम्या

 आगामी निवडणुकांमध्ये विजय महायुतीचाच होणार : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे


- महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा महा मेळावा 
- महाराजा लॉन धानोरा रोड, गडचिरोली येथे आयोजित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महायुतीचा जिल्हास्तरीय महा कार्यकर्त्यांचा मेळावा खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहीते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाराजा लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.

या महायुतीच्या महामेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी संबोधित करताना बोलले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर विश्वास ठेवून देशामध्ये दुसऱ्या वेळेस भारतीय जनता पार्टी व महायुतीला पूर्ण बहुमताने विजय प्राप्त करून दिले, तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र मध्ये जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत महायुतीला दुसऱ्या वेळेस महायुतीला पूर्ण बहुमताने सत्ता दिली. परंतु शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासोबत जाऊन सत्ता बसविले.

परंतु एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनी सत्तेमधून बाहेर पडून २०२१ मध्ये भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता बसविली. त्याच्यामुळे महायुतीला पूर्ण बळ मिळालेला आहे. 

येणाऱ्या लोकसभा निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये विजय महायुतीचाच होणार व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील खासदार तसेच जिल्ह्यामधील तीनही विधानसभा क्षेत्रा मधील आमदार सुद्धा महायुतीचाच होणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार, राष्ट्रवादी क युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक , भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिता हिंगे, आठवले गटाचे मेघनाथ घुटके, कवाडे गटाचे भानारकर, शिवसेनाच्या अमिता मडावी, तसेच मोठया संख्येने महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos