महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१५ जानेवारी महत्वाच्या घटना

१५५९ : राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

१७६१ : पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१८६१ : एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१८८९ : द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

१९४९ : जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

१९७० : मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.

१९७३ : जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

१९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

१९९९ : गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००१ : सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

१५ जानेवारी जन्म

१७७९ : ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचे एक संस्थापक रॉबर्ट ग्रँट यांचा जन्म.

१९२० : कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)

१९२१ : महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

१९२६ : भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)

१९२९ : गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)

१९३१ : मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.

१९४७ : पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.

१९५६ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.

१५ जानेवारी मृत्यू

१९७१ : अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे निधन. (जन्म: ३० मे १९१६)

१९९४ : गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी हरिलाल उपाध्याय यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९८ : भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८९८)

२००२ : राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे निधन.

२०१३ : समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)

२०१४ : दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos