महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी डूर्के परिवाराला केली आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील छालेवाडा येथील तिरुपती डूर्के यांनी गेल्या चार- पाच दिवसापासून कीडनीची आजाराने त्रस्त होते. त्यांना नातेवाईकांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केली. मात्र त्यांचे आजाराने बरे होत नसून तिरुपती डूर्के यांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्या परिवाराला खूपच अडचण भासत होती.

याबाबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहीत होताच त्यांनी लगेच भ्रमणध्वनी वरून आपल्या मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम यांना माहिती देत यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथील त्या रुग्णाला भेट घेऊन त्या नातेवाईकांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यावेळी अजय कंकडालवार यांचे समस्त डूर्के कुटुंबियांनी आभार मानले.

यावेळी मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम, प्रकाश दुर्गेसह मट्टामी, सुरेश मट्टामी, अभिजित दासरवार, संतू नरोटे उपसरपंच, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, दिवाकर ईप्पावारसह आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos