महत्वाच्या बातम्या

 खेळामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्टया निरोगी राहण्यास मदत होते : लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे


- अप्पर-डिपर क्रिकेट प्रीमियम लीग स्पर्धेला सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : क्रिकेट खेळल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्टया निरोगी राहण्यास मदत होते. तसेच खेळण्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय राहते. शारीरातील रक्ताभिसरण चांगल्या पध्दतीने होत असते, प्रतिपादन लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले आहे.

गडचिरोलीच्या जिल्हा स्टेडियमवर अप्पर-डीपर क्रिकेट प्रीमियम लीग व करंडक सामन्याचे आयोजन करण्यात आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत. याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

गोंडवाना विध्यापिठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर अध्यक्ष स्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे होते.

यावेळी डॉ. यशवंत दुर्गे, नंदकिशोर काथवटे, बलराम सोमनानी, अविनाश भांडेकर, नप उपमुख्यध्याकारी रविंद्र भांडारवार, अनुराग पिपरे, निखिल मांडलवार व खेळाडू उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos