महत्वाच्या बातम्या

 सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपून देश घडवा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


- टाकळी येथे बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटरचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : देशात जातीय तेढ निर्माण करून माणसाला माणसाशी तोडण्याचे काम सुरू आहे. अशातच एक ग्रामीण कलावंत आपल्या महाराष्ट्राची परंपरेचा सांस्कृतिक व सामाजिक वारसा जोपासत टाकळी ता. भद्रावती सारख्या छोट्याश्या गावात पुरोगामी विचारांचे प्रेरणादायी कलावंत निर्मना हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रिय कल्चरल सेंटर उभारत आहे. ही वाख्यानेजोगी बाब असून यातून निश्चितच देशातील युवांना देश सेवेची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते भद्रावती तालुक्यातील टाकळी येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटर उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळा प्रसंगी प्रामुख्याने मंचावर उद्घाटक म्हणून वरोरा विधानसभा क्षेत्र आमदार प्रतिभा धानोरकर, सांस्कृतिक मंत्रालय चेयरमन डॉ. विनोद इंदुलकर, डॉ. निळकंठ कुरसंगे, बापुदास गजभारे, कुशल मेश्राम, डॉ. इसादास भडके, इंजि. भास्कर चव्हाण, सेवादल जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खणके, भीम आर्मी महासचिव शंकर मुन, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपूरे, चंद्रपूरच्या माजी महापौर संगीता अमृतकर, गोपाल अमृतकर, टाकळी येथील सरपंच संगीता देहारकर, माजी सरपंच नत्थु पाटील आसेकर, पोलिस पाटील शितल दूरन्गकर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधले असून मोजक्या व्यापाऱ्यांच्या नफेखोरीसाठी गोरगरिब जनतेची दिशाभूल करत लूट केली जात आहे. आज देश गुलामगिरीच्या वाटेवर जात आहे. अश्यातच महाराष्ट्राच्या पुरोगमी विचारांचा प्रसार व प्रचार फार महत्त्वाचा असून गांधी विचारधारा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच देशाला तारू शकतात. ही सर्व कल्पना लक्षात घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील एका बोरगाव सारख्या छोट्याश्या गावातून आपल्या कला कौशल्याने नाट्य क्षेत्रात ठसा उमटविनाऱ्या अनिरुद्ध वणकर यांनी जे काम हाती घेतले ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत राहो अशा शुभेच्छा देत त्यांना वेळोवेळी लागणारी मदत आपण करणार असून हे केंद्र भविष्यात नावलौकिकास येईल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी विर योद्धा बिरसा मुंडा या प्रेरणादायी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. सोबतच काही प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेश्राम प्रास्ताविक अनिरुद्ध वणकर तर आभार प्रवीण भसारकर यांनी मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos