यंग चांदा ब्रिगेडची गोंडवाना विद्यापीठावर धडक, पदव्युत्तर पदवीच्या १० टक्के जागा वाढणार


- अनेक  प्रश्नांवर सकारात्मक चर्चा, विविध महाविदयालयातील शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
गोंडवाना विदयापीठा बाबतच्या अनेक  तक्रारी किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर काल बुधवारी  यंग चांदा ब्रिगेडच्या विदयार्थी ब्रिगेडने गोंडवाना विदयापीठावर धडक दिली. यावेळी  उपकुलगुरु डॉ. सी.व्ही. भुसारी, यांच्याशी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर पोस्ट पदविधरच्या १०  टक्के जागा वाढवीण्याचे कुलगुरुंनी मान्य केले आहे. तसेच ईतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
 यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या विदयार्थी ब्रिगेडचे पंकज चिमूरकर, तुषार  बावने, प्रणित अहिरकर, साहिरी चिडे, मयुरी येरणे यांच्यासह चंद्रपूरातील विविध महाविदयालयातील शेकडो विदयार्थ्यांचा सहभाग होता. 
  २००२ - २००३ या सत्रात रा. तू. म. नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यासाठी कँरीऑन योजना सुरु केली आहे. मात्र २०१२ - २०१३ या सत्रापासून गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत येणा-या महाविद्यालयांना कँरीऑन पद्धत नसल्यामुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ नियम २०१६ यानुसार विभाग ३३ उपविभाग १ व विभाग ३३ उपविभाग १ या नियमानुसार विद्यापीठाच्या कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या हितासाठी कँरीऑन पद्धत देण्याचा अधिकार असतो. असे असले तरी येथील विद्यार्थ्यांना कँरीऑन पध्दत लागू करण्यात आलेली नाही. त्यामूळे या विद्यापीठाच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्याचे भविष्य धोक्यात आले आहे. तसेच दरवर्षी अप्पर पदविधर शाखेमधून दरवर्षी शेकडो विदयार्थी उत्तीर्ण होत असतात मात्र पोस्ट पदविधरच्या जागा कमी असल्यामूळे त्यांना पोस्ट पदविधरच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागते. परिणामी पोस्ट पदविधरच्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नूकसान होत आहे. यासह गोंडवाना विदयापीठा बाबतच्या अणेक तक्रारी किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यामूळे गोंडवाना विदयपीठात कँरीऑन पध्दत सुरु करण्यात यावी व पोस्ट पदविधर च्या विदयार्थ्यांच्या 10 टक्के जागा वाढवीण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. या मागणी करिता काल बुधवारी विद्यार्थी ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह गोंडवाना विद्यापीठ गाठण्यात आले त्यानंतर उपकुलगूरु भुसारी यांच्याशी चर्चा करण्यात आली चर्चे अखेर पोस्ट पदविधर च्या १०  टक्के जागा वाढवीण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या निर्णयानंतर विदयार्थ्यांनी यंग चांदा ब्रिगेडचे आभार मानले गोंडवाना विदयापीठा अंतर्गत येणाऱ्या  अडचणी सोडवीण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून वेळो वेळी आंदोलन करु असे आश्वासण यावेळी विदयार्थी ब्रिगेडचे पंकज चिमूरकर यांनी विदयार्थ्यांना दिले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-22


Related Photos