महत्वाच्या बातम्या

 स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभाविप युवा सप्ताहाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहेरी जिल्हा तर्फे अहेरी नगरातील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्य अभाविप युवा सप्ताहाचे उद्घाटन कार्यक्रम करण्यात आले. या कार्याक्रमामध्ये वकृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेऊन त्यांना प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरव करण्यात आले.

 यावेळी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तर मनोरंजन मंडळ, कार्याक्रमचे प्रमुख वक्ते प्रध्यापाक रमेश हलामी, अहेरी जिल्हा संयोजक रोहित अविनाश श्रीरामवार, अहेरी नगर मंत्री अभिषेक मोहुर्ले, अहेरी नगर महाविद्यालय प्रमुख अजय सिलवेरी, कु. रितिका दंडीकवार, राजेश किसरवार, करण मारशेटीवार उपस्थित होते. 

प्रास्ताविक भाषण अहेरी नगराध्यक्ष प्राध्यापक गिरीश मद्देर्लावार दिले आणि आभार प्रदर्शन आलापल्ली नगर मंत्री रोहित मुक्कावार याने दिले. याप्रसंगी प्रा. सौ कुंडू, प्रा. शिरभाई, प्रा सरमुकद्दम, प्राध्यापक मोरे, प्राध्यापक राठोड, प्राध्यापक रोहनकर, प्राध्यापक खोब्रागडे, प्राध्यापक धुर्वे, उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक खंडाळे, प्राध्यापक उरकुडे, प्राध्यापक बारसे आणि विद्यार्थिनी विद्यार्थी कार्यकते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहेरी सहमंञी आयुष मामिडवार याने केले.

युवक दिनाच्या अवचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद युवा सप्ताह म्हणून साजरा करते. अहेरी जिल्ह्यातील विद्यालय - महाविद्यालयात आठवडा भराचे कार्यक्रमांचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशा प्रति प्रेम, वैयक्तिक विकास, वकृत्व या सगळ्या गोष्टींचा विकास या कार्यक्रमाने वाढविण्याचा प्रयत्न अभावीप करत असते. अहेरी जिल्ह्यातल्या अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मूलचेरा, आष्टी या सगळ्या तालुक्यात अभावीप विद्यार्थी कार्यकर्ते कार्यक्रम घेणार आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos