हिंदी विश्‍वविद्यालयात राष्‍ट्रीय परिसंवादात गांधी विचारांवर चिंतन - प्रो. जी. गोपीनाथन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात ‘गांधी आणि त्‍यांची समसामायिक प्रासंगिकता : समाज, संस्‍कृती आणि स्‍वराज’ विषयावर राष्‍ट्रीय परिसंवादात गुरुवार २२ रोजी माजी कुलगुरु प्रो. जी. गोपीनाथन  यांनी ‘भूमंडलीकरण आणि  स्‍वदेशी’ विषयावर विचार मांडले. ते म्‍हणाले की गांधीजींची स्‍वदेशी ही  कल्‍पना आजही प्रासंगिक आहे. गांधीजींनी अहिंसा आणि सत्‍याग्रहाचा आविष्‍कार करत त्‍यातून चळवळ उभारली. त्‍यांचा हा आविष्‍कार आजच्‍या घडीला मानवजातीच्‍या अस्तित्‍वाकरिता महत्‍वाचा मार्ग होय. गांधींनी देशांतर्गत तंत्रज्ञानाचा विकास केला हे पटवून देतांना प्रो. गोपीनाथन म्‍हणाले की चरखा, खादी वस्‍त्र यांचा उपयोग करुन त्‍यांनी देशी तंत्रज्ञानातून देश स्‍वावलंबी होईल हे सांगितले. गांधीजींनी वर्धेत राहून जैविक शेती, नई तालिम, गोरस भंडार, नैसर्गिक आहार, आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार, पंचभूती असे यशस्‍वी प्रयोग केले व जनमानसाला त्‍याचे महत्‍वही पटवून दिले. प्रो. गोपीनाथन म्‍हणाले की आजच्‍या गरजा लक्षात घेऊन देशांतर्गत तंत्रज्ञानाचे नवीकरण केले पाहिजे. हिंदी और गांधी हा संदर्भ देत ते म्‍हणाले की वर्धेत राष्‍ट्रभाषा प्रचार समितीची स्‍थापना केली आणि त्‍याचा प्रचार-प्रसार मिशनरी पद्धतीने केला. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा स्‍थापन करत फीजी, सुरिनाम सारख्‍या देशात हिंदीचा विस्‍तार केला असेही ते म्‍हणाले.  
कालीकट येथील प्रो. के. एम. मालती यांनी ‘भारतातील स्‍त्री मुक्ती आंदोलनात महात्‍मा गांधी यांची भूमिका’ या विषयावर विचार मांडले. त्‍या म्‍हणाल्‍या, गांधीजींनी वर्धेत १९१२ मध्‍ये कन्‍या आश्रम आणि मातृसेवा संघ की स्‍थापना केली. स्‍त्री-पुरुष समानता, आंतरजातीय विवाह यासाठी त्‍यांनी काम केले व महिलांना जागरूकही केले. हुंडा प्रथेला त्‍यांचा विरोध होता. हरिजन परिवारातील लक्ष्‍मी या महिलेला त्‍यांनी दत्‍तक घेऊन महिला मुक्‍तीच्‍या दिशेने प्रभावी पाऊल उचलले असेही त्‍या म्‍हणाल्‍या. अध्यक्षीय भाषणातून गुजरात विद्यापीठातील प्रो. पुष्‍पा मोतियानी आणि देवजानी चक्रबोर्ती यांनी समयोचित विचार मांडले. यावेळी देशभरातून उपस्थित झालेले गांधी विचारवंत,चिंतक आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
  Print


News - Wardha | Posted : 2019-08-22


Related Photos