प्रधानमंत्री किसान मानधन योजनेतून शेतकरी पेन्शन नोंदणीला सुरुवात


- नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने महत्वकांक्षी प्रधानमंत्री किसान मानधन योजना   ९ ऑगस्ट   पासून सुरु केली आहे. यात १८  ते ४०  वयोगटातील शेतकऱ्यांना ५५  ते दोनशे रुपये प्रती महिना नोंदणी केलेल्या खात्यात भरायचे  आहे. यात तेवढीच रक्कम शासन भरेल त्यानंतर वयाच्या साठीनंतर प्रती महिना ३ हजार  रुपये निवृत्ती वेतन (पेन्शन) शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेचा सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
 अल्प व अल्पभुधारक शेतकऱ्यासाठी एक ऐच्छिक योगदान देणारी पेन्शन योजने ला सरकारने मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांकडे उतार वयात पैसा नसतेा त्यामुळे त्यांना रोजच्या गरजा भागविणे अवघड होऊन बसते याचा विचार करुन सामाजिक हेतूने सरकारने ही योजना काही अटीसह लागु केली आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रती महिना ३  हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. वयाची ६०  वर्षे पुर्ण  केल्यानंतर शेतकऱ्यांना ही पेन्शन मिळेल. या योजनेसाठी १८  ते ४०  या वयोगटातील शेतकऱ्यांना 'सीएससी' कडे (CSC) नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. यात १ ऑगस्ट   रोजी १८  वर्षे पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्यांना यात भाग घेता येईल. वयोमानानुसार ५५  ते २००  रुपया पर्यंत हप्ता रक्कम शेतकऱ्यांना पेन्शन फंडामध्ये जमा करावी लागेल. तेवढीच रक्कम शासन भरणार आहे. यात पती - पत्नी दोघांनाही भाग घेता येईल. या योजनेतून बाहेर पडायचे झाल्यास पेन्शन फंडामध्ये झालेली रक्कम व्याजसह परत मिळेल. तसेच साठ वर्षापूवी संबंधीताचा मृत्यु झाल्यास त्याच्या जवळच्या व्यक्तीला त्याचे खाते सुरु ठेवून पैसे जमा करता येईल. तसेच खाते सुरु नसल्यास अर्धे म्हणजेच १५००  रुपये पारिवारिक मासिक पेन्शन मिळेल. या योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

योजनेच्या अपात्रतेचे निकष 

 हे शेतकरी अपात्र ठरतील :  राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना, कर्मचारी राज्य निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्रनायझेशन स्किम या सारख्या सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणारे शेतकरी, कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमध्ये निवड झालेली शेतकरी, कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधान योजनेतील शेतकरी, उच्च आर्थिक स्थितीतील  शेतकरी , ज्यात आजी - माजी  लोकप्रतीनिधी, राज्य व केंद्र शासनाने कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी, मागील वर्षात आयकर भरलेले, तसेच नोदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखपाल, आर्किटेक्ट आदी.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-22


Related Photos