बल्लारपूर शहरात अस्वलीने घातला धुमाकूळ, वनविभागाने केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मुन्ना खेडकर/ बल्लारपूर 
: शहरात मध्यरात्रीपासून अस्वलाने धुमाकूळ माजविल्याने खळबळ निर्माण झाली होती.  मात्र जलद बचाव दलाने मोहीम राबवून अस्वलाला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 
शहरात रात्री  पासून वस्ती विभाग सराफा परिसरामध्ये  अस्वल दिसून आले. तेव्हा पासूनच सोशल मीडिया वर व्हिडिओ वायरल झाला. वन विकास महामंडळाचे   अध्यक्ष चंदन सिंग चंदेल यांनी फोन द्वारे वनपरीक्षेत्र अधिकारी थीपे यांना कळविले असता थीपे यांनी मध्य चांदा वन विभाग वरून (RRT) जलद बचाव दलाला  पाचारण केले.  अस्वलाने  वस्ती विभागात धुमाकूळ घालून रेल्वे रूळ पार करून थेट वनविभागाचा डेपो मध्ये शिरला.  तेथे जलद बचाव दलाने  अर्धा  ते पाऊण तासातच अस्वलाला पिंजऱ्यात कैद केले. यामुळे नागरिकांनी सूटकेचा श्वास  घेतला. या वेळी वन वनविभागाचे  अधिकारी थीपे , वनपरिक्षेत्र अधिकारी हिरे, वीरूटकर व  सर्व कर्मचारी उपस्थित होते.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-22


Related Photos