महत्वाच्या बातम्या

 झिंगानूर ते रमेशगुडम रस्त्याचे होणार बांधकाम : माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या झिंगानूर ते रमेशगुडम रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

सिरोंचा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या या परिसरात मागील अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठी निधी उपलब्ध करून दिली. झिंगानूर ते रमेशगुडम पर्यंत जवळपास सहा किलोमीटर चे बांधकाम होणार असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे या भागात लोकप्रतिनिधी ढुंकूनही पाहत नाहीत. मात्र, भाग्यश्री आत्राम या महिला लोकप्रतिनिधीनी या परिसरातील नागरिकांच्या संपर्कात राहून अडीअडचणी जाणून घेत विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केले आहे.त्यामुळेच या भागात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे होताना दिसत आहेत.

या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गावात प्रवेश होताच गावकऱ्यांनी भाग्यश्री आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि विकासात्मक कामाबद्दल आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, विजय तोकला, सत्यनारायण चिलकामारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष एम डी शानु,रवी सुलतान, देवय्या येनगंदुला, गणेश बोधनवार, मयूर पुप्पलवार, संदीप गागापुरप, संतोष पेराला, सरपंच नीलिमा मडावी, बोडखा गावडे, आनंदराव कोंडागुर्ला, संतोष गावडे, सचिन मडावी, सन्नि मडावी, जगदीश कुमरी आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos