महाराष्ट्राची उपराजधानी हादरली : नागपुरात एकाच रात्री तिघांची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
एकाच रात्री तीन खून झाल्याने महाराष्ट्राची उपराजधानी हादरली आहे. खून झालेल्या व्यक्तींमध्ये प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला यांचा समावेश आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केडीके कॉलेजजवळ काल  २१ ऑगस्ट रोजी  रात्री सैयद इम्रान सय्यद नियाज नामक तरुणाची हत्या करण्यात आली. दुसरी घटना सदर भागातील गोंडवाना चौकात घडली. प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (५०) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा खून दिघोरी परिसरातील सेनापतीनगरात झाला आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी विकी विजय दहाट (३२) या तरुणाची हत्या केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजेंद्रनगर चौकात खरेदी केलेल्या आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केले. भाजी विक्रेत्याचा सहकारी सैयद इमरान सय्यद नियाज हा बाजूला असलेल्या पानठेल्यावर उभा होता. इमरान हा मदतीसाठी धावला असता त्याच्याही पोटात चाकू भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात इमरान खाली कोसळला. मारेकरी पसार झाले. परिसरातील नागरिकांनी इमरानला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-08-22


Related Photos