महत्वाच्या बातम्या

 १५ जानेवारीला महिला लोकशाही दिनाचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. ऑगस्ट महिन्याचा महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

समस्याग्रस्त व पीडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा. यादृष्टीने माहिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो.

लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.





  Print






News - Nagpur




Related Photos