महत्वाच्या बातम्या

 दुचाकी खाजगी वाहन आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी संपर्क साधावा


- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (नागपूर शहर) यांचे कार्यक्षेत्रात नव्याने नोंद होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी MH३१FZ ही नवीन मालिका १५ जानेवारीपासून सूरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या तरतुदीनुसार नवीन वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यात येतो. अर्जदार यांनी अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) येथे संपर्क साधावा.

M३१FZ ही नवीन मालिका व मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या ५ (अ) मध्ये विहित केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड आदींची साक्षांकित प्रत ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन ४.० या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून कार्यालयीन वेळ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत आहे.

पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला दुपारी ३.३० वाजेपर्यंत निर्धारीत फी पेक्षा जास्त रकमेचा डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरणा केल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील.





  Print






News - Nagpur




Related Photos