नाट्यमयरित्या पी चिदंबरम आले, पत्रकार परिषदेत मांडली बाजू, अटकेची शक्यता


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अखेर समोर आले असून २७ तासांनंतर नाट्यमयरित्या काँग्रेस कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.  मात्र कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 
मी लपत नव्हतो, तर वकिलांसोबत मिळून न्यायालयात लढण्याची तयारी करत होतो असं त्यांनी सांगितलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. ईडीचे अधिकारी पी चिदंबरम यांच्या अटकेसाठी गेले होते. मात्र पी चिदंबरम घरी नसल्याने त्यांना मोकळ्या हाती परतावं लागलं होतं. यानंतर पी चिदंबरम नेमके कुठे आहेत याची चर्चा सुरु होती. पण अखेर नाट्यमयरित्या पी चिदंबरम समोर आले असून आपली बाजू मांडली आहे. अवघ्या पाच मिनिटांत त्यांनी आपली पत्रकार परिषद संपवली. दरम्यान पी चिदंबरम यांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे.   Print


News - World | Posted : 2019-08-21


Related Photos