महत्वाच्या बातम्या

 स्वामी विवेकानंद यांचे विचार व शिकवण हा भारतातील एक महान सांस्कृतिक आणि पारंपारिक ठेवा : खासदार रामदास तडस


- नेहरू युवा केंद्र वर्धा (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) द्वारा राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम

- नाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : स्वामी विवेकानदं यांनी तरुण वयात भारताचे नाव जागतिक स्तरावर नेले, स्वामी विवेकानंद यांनी अल्प जीवनकाळात जे कार्य केले त्यामुळे भविष्यातील अनेक पिढ्यांना हे मार्गदर्शक ठरलेले आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुण भारतात आहे. युवक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे. या तरुणाईमध्ये अफाट सामर्थ्य आहे, म्हणूनच बुद्धिमान, ओजस्वी, अष्टपैलू आणि तेजस्वी अशा स्वामी विवेकानंद यांच्या विचार, कार्य आणि भूमिकेचा आदर्श भारतातील सर्व तरुणांनी घ्यावा, स्वामी विवेकानंद यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि त्यांची शिकवण हा भारतातील एक महान सांस्कृतिक आणि पारंपारिक ठेवा असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले तसेच युवकांना राष्ट्रीय युवा दिनानिमीत्य शुभेच्छा दिल्या. ते राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात बोलत होते.

आज १२ जानेवारी २०२४ रोजी नेहरू युवा केंद्र वर्धा (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) द्वारा इंद्रप्रस्थ न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा येथे राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, वर्धा, महिला विकास संस्थाचे सचिव डॉ. अभिजित वेरुळकर, प्राचार्य डॉ.ए.व्ही. ससनकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा व मान्यवर उपस्थित होते.

आमदार रामदास आंबटकर यांनी स्वामी विवेकानंदजी यांच्या नियमावर चालून युवकांनी त्यांची ध्येय प्राप्त होई पर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका, असे युवकांना संबोधित केले. वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्याकडून चंदु खोंडे व रियाज खान यांनी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह बद्दल माहिती देऊन वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे सांगितले. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा विजेता वेदांत रोकडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य भाषण दिले. सर्व मान्यवरांनी नाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण. 

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा प्रास्ताविक मध्ये नेहरु युवा केंद्र वर्धा व्दारे युवकांना केलेले कार्य तसेच पुढील रुपरेषा सांगीतली बघितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन न्यू आर्ट कॉलेजचे प्राध्यापक पेठारे सर यांनी मानले. नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोशन सयाम, आकाश मेलेकर, आकाश चौधरी यांनी My Bharat पोर्टल वर युवकांची नोंदणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश इंगोले, शुभम ताकसांडे, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठया संख्येने युवक व युवती उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos