महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर मध्ये ब्राऊन शुगर ची विक्री, दोन आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी चंद्रपूर : छुप्या पध्दतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे, याची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींना अटक केली. ९ जानेवारीला शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगर ची विक्री करतो, माहितीच्या आधारे पोलीस पथकाने धाड टाकून सोहेल शेख सलीम शेख वय २३ वर्ष रा.जुनी लालपेठ वस्ती चंद्रपूर याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून ७.१२ ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर सहित एकूण ५७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सोहेल ची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की सदर ब्राऊन शुगर हे भंगाराम वार्ड येथे राहणारा आवेश शब्बीर कुरेशी वय ३८ वर्ष याचे असून मी फक्त विक्री करतो.

चंद्रपूर शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून ताब्यात घेतले असून  दोघांवर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, सपोनि. मंगेश भोंगाडे, सपोनि. रमीझ मुलानी, पोउपनि शरिफ शेख, विलास निकोडे, पो.हवा.महेंद्र बेसरकर, पो.हवा.जयंता चुनारकर, संतोष पंडीत,  सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, नापोशि.चेतन गज्जलवार, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते यांनी केलेली आहे. सदर गुन्हयातील पुढील तपास सपोनि.मंगेश भोंगाडे करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos