महत्वाच्या बातम्या

 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम : कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बिझी शेड्युलमुळे लोकांना आजकाल स्वतःची काळजी घेणे कठीण झाले. चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. यामुळे अनेक आजार मागे लागतात.

यामध्ये गंभीर आजारांचाही समावेश असतो. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येतोय. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 

सरकारच्या निर्णयानुसार, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षांत तीन टप्प्यांत राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. येत्या जुलै महिन्यापासून ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेला साडेसहा ते सात कोटी लसींचा साठा सरकारकडे आल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाव्यतिरिक्त, ही लस ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे होणारा गुदद्वाराचा कर्करोग, योनी आणि घशाजवळील भागाच्या कॅन्सरचाही प्रतिबंध करते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही लसीकरण मोहीस सलग ३ वर्ष राबवण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत प्रत्येक वर्षी ९ ते १४ वर्षे वयोगटातील एक तृतीयांश मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान ही लसीकरण मोहीमेची सुरुवात कोणत्या राज्यातून करावी यावर सध्या सरकार विचार करतंय.

गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण किती?

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरते सर्वाधिक रुग्ण आढळणारा भारत हा पाचवा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख रुग्णांची नोंद होताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ७५ हजार महिलांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे. एचपीव्ही उपप्रकाराच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका अधिक आहे.

एचपीव्ही वॅक्सिन काय करते? : 

HPV लस सामान्यतः कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी वापरली जाते. ही लस दिल्याने HPV मुळे होणाऱ्या योनी, लिंग किंवा गुदद्वाराच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळते. ही लस जननेंद्रियातील चामखीळ किंवा गुठळ्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते.





  Print






News - Rajy




Related Photos