महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांमध्ये इंडियन रेल्वे तर महिलांमध्ये कर्नाटक संघ प्रथम 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : १० जानेवारी २०२४ ला शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दी महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमान ६ ते १० जानेवारी २०२४ या दरम्यान ६९ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

सदर स्पर्धेमध्ये पुरुषांच्या जवळपास ३० तर महिलांच्या २६ संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत देशातील विविध भागातील राज्यांनी उदाहरणार्थ जम्मू-काश्मीर, लडाख, कर्नाटका, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्याच्या संघांनी सहभाग नोंदविला. 

या राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक इंडियन रेल्वे संघाने, द्वितीय क्रमांक आंध्र प्रदेश, तृतीय क्रमांक तामिळनाडू, चतुर्थ क्रमांक कर्नाटका तर महिला गटात प्रथम क्रमांक कर्नाटका, द्वितीय क्रमांक तामिळनाडू तृतीय क्रमांक केरला तर चतुर्थ क्रमांक आंध्रप्रदेश संघाने पटकावला.

डबल मेन्स या क्रीडा प्रकारात पुरुष गटात प्रथम क्रमांक तामिळनाडू, द्वितीय केरला, तृतीय कर्नाटका, चतुर्थ आंध्र प्रदेश. महिला विभागात प्रथम क्रमांक कर्नाटका, द्वितीय क्रमांक तामिळनाडू, तृतीय क्रमांक बिहार, चतुर्थ क्रमांक आंध्र प्रदेश संघाने. मिक्स डबल या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तामिळनाडू द्वितीय क्रमांक आंध्र प्रदेश, तृतीय क्रमांक केरला चतुर्थ क्रमांक कर्नाटका या संघाने पटकावला.

या बक्षीस वितरण समारंभ दरम्यान बेस्ट अपकमिंग प्लेयर म्हणून गडचिरोली जिल्ह्याचा खेळाडू पंकज राठोड, बिहार संघाचा दीपक प्रकाश, वेस्ट बंगाल संघाचा मांयकल मंडल, दिल्ली संघाचा राहुल प्रसाद, छत्तीसगड संघाचा गौरव तिवारी तर महिला विभागात राजस्थान संघाची सलोनी, बिहार संघाची वंदना कुमारी, छत्तीसगड संघाची शगुन सिंग, महाराष्ट्र संघाची हर्षदा मोरे, हरियाणा संघाची जानवी यांना गौरवण्यात आले. तर स्टार ऑफ इंडिया या विशेष पुरस्काराने इंडियन रेल्वे संघाचा डी वेंकटेश गणेश, आंध्र प्रदेश संघाचे रुपेंद्र, इंडियन रेल्वे संघाचा एन कलाई सैलवान, तामिळनाडू संघाचा गणेश कुमार, तर महिला विभागात कर्नाटका संघाची सहाना, तामिळनाडू संघाची मालिनी, कर्नाटका संघाची पल्लवी, आंध्र प्रदेश संघाची काव्यश्री, केरळ संघाची जोशना जॉन यांना गौरवण्यात आले. 

अतिशय उत्साहाच्या वातावरणात ही राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १० जानेवारी २०२४ ला आयोजित करण्यात आला होता. या बक्षीस वितरण समारंभाचे संचालन डॉ. राकेश चडगुलवार प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. ऋषिकांत पापडकर तर आभार बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष ओम प्रकाश संग्रामे यांनी केले. 

या बक्षिस वितरण समारंभास प्रमुख बक्षीस वितरक म्हणून गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम या उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी उपस्थित होते. 

प्रमुख अतिथी म्हणून बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव वाय राजाराव गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. अनिता लोखंडे, कार्मेल हायस्कूलच्या प्री प्रायमरी सेक्शन चा इन्चार्ज प्रिया रोहनकर, बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे कार्याध्यक्ष डी एस गोसावी, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्य प्राध्यापक रूपाली पापडकर, महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमी नागपूरचे संचालक मंगेश राऊत तसेच बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे तमाम संघटना पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos