महत्वाच्या बातम्या

 अमरावती येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : स्टेशन हेडक्वार्टर पुलगाव यांच्यावतीने जोग स्टेडीयम पोलिस मुख्यालय येथे १४ जानेवारी रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात माजी सैनिक व त्यांच्या अवलंबिताच्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. या मेळाव्याचा माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती येथे सकाळी ११ वाजता आयोजित मेळाव्यात युध्दविधवा, वीरमाता व विरपीता यांचा सत्कार करण्यात येणार असून सिएसडी कँटीन व ईसीएचएस पॉलीक्लिनीक सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच सैन्य अभिलेख कार्यालय, स्पर्श पेंशन प्रणाली बाबत येणाऱ्या अडचणी व तक्रारी बाबतचे निराकरण करण्यात येणार आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा, वीर माता व अवलंबितांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos