महत्वाच्या बातम्या

 राज्यस्तरीय पथकांची जन्म मृत्यु व विवाह नोंदणी केंद्रांना भेटी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार नागरी नोंदणी पध्दती अंतर्गत आरोग्य सेवा उपसंचालक तथा जन्म मृत्यु उपमुख्य निबंधक व त्यांच्या  पथकांनी जिल्ह्यातील जन्म मृत्यु नोंदणी व विवाह नोंदणी केंद्रांना भेटी देऊन नोंदणीच्या कार्याची तपासणी  केली.

भेटी दरम्यान पथकांनी प्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जन्म व मृत्यु जिल्हा निबंधक डॉ.रा.ज. पराडकर यांच्याखडून जन्म, मृत्यु व विवाह नोंदणी बाबत जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेऊन चर्चा केली. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांची भेट घेऊन नोंदणीच्या कार्याची पाहणी करुन मार्गदर्शन केले. जिल्ह्यात सर्व नोंदणी केद्रांनी केंद्र शासनाच्या सीआरएसओआरजी या संगणक प्रणालीवर जन्म मृत्यु नोंदणी करण्याबाबत आवाहन केले.

या तपासणी दरम्यान अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल कासारे, सांख्यिकी पर्यवेक्षक यु.एस.राठोड, सांख्यिकी अन्वेषक एस.एस. गावीत उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात सन २०२३ मध्ये १५ हजार ५९२ मृत्यु व ९ हजार ८६७ जन्य झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos