घोट - आष्टी मार्गावर बोलेरो वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली 
:  घोट- आष्टी मार्गावरील ठाकूरनगर गावानजीक काल  २० ऑगस्ट रोजी  सायंकाळी ६.४५ च्या सुमारास दूचाकी  व बोलेरोला वाहनाच्या आमने -  सामने झालेल्या धडकेत दुचाकी चालक रूपेश नारायण सरकार (२८ ) रा. कोनसरी हा युवक जागीच ठार झाला.
प्राप्त माहितीनुसार तो आष्टी पेपरमिलमध्ये काम करीत होता.काही कामानिमित्त तो घोट येथे आला होता. घोट येथील काम आटोपल्यानंतर तो घोट येथून  दुचाकी  वाहन क्रमाक एम.एच ३३ पी १५०३ ने कोनसरीकडे परत जात होता. दरम्यान विरूद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक एम एच-३३ ए / २१८६ ने त्याच्या दुचाकीस समोरून धडक दिली. यामध्ये तो जागीच ठार झाला.  सदर घटनेचा तपास घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक  जगदाळे करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-21


Related Photos