चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बेंगळुरू :
श्रीहरिकोटातील प्रक्षेपणाच्या २९ दिवसांनंतर चांद्रयान- २ ने आज सकाळी ९.३० वाजता चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यानंतर ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देतील. 
चांद्रयान -२ ने ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. आज सकाळी चांद्रयान २ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आता चांद्रयान-२ हे ११८ किलोमीटर एपोजी (चंद्रापासून कमी अंतरावर असलेला) आणि १८०७८ किलोमीटरच्या पेरीजी (चंद्रापासून दूर अंतरावरील) अंडाकृती कक्षेत २४ तास प्रदक्षिणा घालणार आहे. यादरम्यान चांद्रयान -२चा वेग १०.९८ किमी प्रतिसेकंदवरून कमी करून १.९८ किमी प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. चांद्रयान २ चा वेग ९० टक्क्यांनी कमी केला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळं अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-२ चा वेग कमी करण्यात आला आहे.   Print


News - World | Posted : 2019-08-20


Related Photos