महत्वाच्या बातम्या

 ३ मार्चला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ३ मार्चला जिल्हा न्यायालयात करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील न्यायालयीन प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तडजाडीसाठी ठेवण्यात येणार असून संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्या. सचिन पाटील यांनी केले आहे.

संपूर्ण राज्यात उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठ, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधिकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos