देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एएनआयने एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जेटली यांच्यावर कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (IABP) सपोर्ट द्यावा लागत आहे. याआधी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं.
श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्री पदासाठी विचार केला जाऊ नये, असे नमूद केले होते.   Print


News - World | Posted : 2019-08-19


Related Photos