कंटनेर - एसटी बसची धडक, भीषण अपघातात १३ जण ठार


वृत्तसंस्था /  धुळे : औरंगाबाद - शहादा एसटी बसला भीषण अपघात झाला असून यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील दोंडाई गावाजवळ हा अपघात झाला. 
 कंटनेर आणि एसटी बसमध्ये समोरा-समोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की एसटी बस एका बाजूने पूर्णपणे कापली गेली. यात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  औरंगाबादहून शहादाला जाणाऱ्या या बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-08-19


Related Photos