महत्वाच्या बातम्या

 मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत EVM वर ब्रेल लिपीचे प्रात्यक्षिक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : निवडणूक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या SVEEP कार्यक्रमांतर्गत विशेष गरजा असलेल्या अंध मतदात्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी EVM मशीनवर असलेल्या ब्रेन लिपीच्या माध्यमातून मतदान करण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक काल ०६ जानेवारी २०२४ ला भागीरथा भास्कर विद्यालयात पूर्ण करण्यात आले.

यावेळी १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांनी EVM वरील ब्रेन लिपीच्या प्रात्यक्षिकाचा उत्स्फूर्तपणे अनुभव घेतला. मतदार जागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून SVEEP कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या अंध विद्यार्थ्यांनी ब्रेन लिपीच्या प्रात्यक्षिकाचा लाभ घेऊन गावागावात विशेष गरजा असणाऱ्या मतदात्यांना ब्रेन लिपी EVM वर कशी वापरावी याचे अनुभव देण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी भाग घेऊन माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या द्वारे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हाधिकारी प्रशांत पिसाळ, उपविभागीय अधिकारी भंडारा बालपांडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा नोडल अधिकारी रवींद्र सलामे, भूषण फसाटे, अरुण मरगडे, विनोद किंदले॔श्री, झुरमुरे, शाळेचे मुख्याध्यापक अंबादे, अंध  विद्यालय प्रभारी उमप यांनी प्रयत्न केले.





  Print






News - Bhandara




Related Photos